प्रतिनिधी/ बेळगाव
वाढत्या उष्म्यामुळे आगी लागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. वेळीच आग आटोक्यात न आल्यास मालमत्तेचे मोठे नुकसान होते. हे टाळण्यासाठी अग्निशमन दल सातत्याने प्रयत्नशील आहे. कुवेंपूनगर येथील केएलई इंटरनॅशनल स्कूलमध्ये अग्निशमन दलाकडून विद्यार्थ्यांना आग विझविण्याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. त्याबरोबर आगीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
विद्यार्थी, शिक्षकांमध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अग्निशमन ठाणाधिकारी व्ही. एस. टक्केकर, शरीफ नदाफ, विरुपाक्षी वस्त्रद, मंजू हदली यासह कर्मचारी उपस्थित होते.