मुडलगी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
वडेरहट्टी (ता. गोकाक) येथील लोकवस्तीतील एका घरात बेकायदा साठवून ठेवण्यात आलेले फटाके जप्त करण्यात आले आहेत. शुक्रवारी मुडलगी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
फटाक्मयांची विक्री व साठा करून ठेवण्यास वेगळे नियम आहेत. खास करून लोकवस्तीत गोदाम असू नये. गणेशोत्सवाच्या काळात लोकवस्तीत 1 लाख 60 हजार 675 रुपये किमतीचे फटाके साठवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी एका घरावर अचानक छापा टाकून तो साठा जप्त केला आहे.
संबंधित दुकानदारांविरुद्ध मुडलगी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. सध्या गणेशोत्सवानिमित्त फटाक्मयांची विक्री जोरात असते. विपेत्यांनी लोकवस्तीत धोकादायकपणे फटाक्मयांचा साठा करू नये, असे आवाहन पोलीसप्रमुखांनी केले आहे.