यात्रेला औपचारिक सुरूवात : 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान यात्रा
वृत्तसंस्था/ श्रीनगर
वार्षिक अमरनाथ यात्रा विधी दक्षिण काश्मीरमधील अमरनाथ गुहेत शनिवारी ‘प्रथम पूजे’ने सुरू झाला. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर (एलजी) मनोज सिन्हा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘प्रथम पूजे’ला उपस्थिती दर्शवली. यावषी तीर्थयात्रा 1 जुलैला सुरू होऊन 31 ऑगस्टला संपणार आहे. गेल्यावषी या यात्रेत सुमारे तीन लाख भाविक सहभागी झाले होते.
यात्राकाळात अमरनाथजी श्राईन बोर्ड जगभरातील भाविकांसाठी सकाळ आणि संध्याकाळची आरती थेट प्रसारित करणार आहे. प्रवास, हवामान आणि अनेक सेवांचा ऑनलाईन लाभ घेण्यासाठी अमरनाथ यात्रा अॅप गुगल प्ले स्टोअरवर जारी करण्यात आले आहे.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) दक्षिण काश्मीरमधील पवित्र अमरनाथ गुहेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील बर्फ हटवण्याचे काम 15 जूनपर्यंत पूर्ण करणार आहे. याशिवाय ट्रॅकचे ऊंदीकरण, सर्व पादचारी पुलांची दुऊस्ती, हँड रेलिंगची दुऊस्ती, संरक्षक भिंती उभारणे आदी कामेही पूर्ण करण्यात येणार आहेत. सीमा रस्ते विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी शनिवारी बालटाल आणि चंदनवाडीला भेट दिली. दोन्ही यात्रा मार्गावरील कामाचा त्यांनी आढावा घेतला.
भाविकांची नोंदणी सुरू
अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे नोंदणी केली जात आहे. अनंतनाग जिह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिह्यातील बालटाल या दोन्ही ट्रॅकसाठी नोंदणी सुरू झाली आहे.
श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या वेबसाईटद्वारे भाविक यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या 316 शाखा, एसबीआय बँकेच्या 99, जम्मू आणि काश्मीरच्या 90 आणि येस बँकेच्या 37 शाखांमध्ये ऑफलाईन नोंदणी केली जाऊ शकते. 13 ते 70 वर्षे वयोगटातील लोक अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी करू शकतात. सर्व भाविकांसाठी आरोग्य प्रमाणपत्र अनिवार्य असून 6 आठवडे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या गर्भवती महिलांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.