प्रतिनिधी/ बेळगाव
घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या मोटारसायकली पेटविण्यात आल्या आहेत. घी गल्ली परिसरात शुक्रवार दि. 14 जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली असून मार्केट पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. समाजकंटकांनी चार दुचाकी पेटविल्याचे सांगण्यात आले. मार्केट पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असली तरी शनिवारी रात्रीपर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल झाला नव्हता.