Khatav Accident News : सुर्याचीवाडी (ता. खटाव) येथे आज सकाळी सहा वाजता चारचाकी गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण ठार आणि चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.खटाव तालुक्यातील बनपुरी आणि सिध्देश्वर कुरोली येथील एकूण आठ जण देवदर्शनासाठी निघाले होते.दहीवडी मायणी रस्त्यावरील सुर्याचीवाडी येथे पहाटे सहा वाजता सदर गाडी झाडावर आदळून भीषण अपघात झाला.अपघातात एक पुरुष आणि दोन महिला जागीच ठार झाल्या.जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु असताना वडूज येथील रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.मृतांमध्ये दहीवडी येथील एका प्रवाशाचा समावेश आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बाळू मामाच्या मेंढराचे एक देवस्थान लाकरेवाडी येथे असून ओमनी गाडीतून लोक देवदर्शनासाठी निघाले होते.पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गाडी झाडावर आदळली.यामध्ये 4 जण जागीच ठार झाले आहेत.तर 4 जण जखमी झाले असून सर्व प्रवासी सिध्देश्वर कुरोली व बनपुरी येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.
पांडुरंग देशमुख यांच्या गाडीतून सर्वजण देवदर्शनासाठी निघाले होते.गाडीची धडक झाडाला एवढी भीषण होती की,गाडीचा चक्काचूर झाला असून गाडीचे दोन भाग झाल्याचे दिसत आहे.या अपघातानंतर घटनास्थळी तातडीने पोलीसांनी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविले आहे.वडूज पोलिस अधिक माहिती घेत आहेत.