वृत्तसंस्था/ टेक्सास
डब्ल्यूटीए टूरवरील 2022 च्या टेनिस हंगामाअखेर येथील झालेल्या महिलांच्या फायनल्स स्पर्धेत फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाने बेलारुसच्या साबालेन्काचा पराभव करत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत चौथी मानांकन जोडी व्हेरोनिका कुडरमेटोव्हा आणि इलेसी मर्टन्स यांनी दुहेरीचे विजेतेपद मिळवले.
सोमवारी या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रान्सच्या गार्सियाने साबालेन्काचा 7-6(7-4), 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. 2022 च्या टेनिस हंगामात डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धांतील अंतिम सामने 29 वर्षीय गार्सियाने जिंकले आहेत. 2022 च्या टेसिन हंगामाअखेर महिलांच्या मानांकन यादीत गार्सियाने चौथे स्थान राखले आहे.
या स्पर्धेतील झालेल्या महिला दुहेरीच्या अटीतटीच्या सामन्यात कुडरमेटोव्हा आणि एलिस मर्टेन्स यांनी विद्यमान विजेत्या बार्बोरा क्रेसीकोव्हा आणि सिनियाकोव्हा यांचा 6-2, 4-6, 11-9 अशा सेटस्मध्ये पराभव करत अजिंक्यपद मिळवले. हा अंतिम सामना सुमारे 100 मिनिटे चालला होता. चालू वर्षीच्या टेनिस हंगामातील कुडरमेटोव्हा आणि मर्टेन्स या जोडीचे हे दुसरे विजेतेपद आहे.