बेळगाव : विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनमार्फत दहावी पुरवणी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दि. 12 ते 19 जूनदरम्यान परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना हॉलतिकीट दाखवून नि:शुल्क प्रवास करता येणार आहे. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत आणि परीक्षा केंद्रापासून घरापर्यंत परीक्षा प्रवेशपत्र दाखवून मोफत प्रवास करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी या मोफत प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाने केले आहे
Previous Articleदाटून आले ढग…पाऊस कधी पडणार बघ !
Next Article मध्यवर्ती बसस्थानकात माहिती कक्ष
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.