खासदार संजय मंडलिक यांचे अतिक्रमणधारकांना आश्वासन : सांगरुळमधील शिष्टमंडळाने घेतली खासदार
प्रतिनिधी/कोल्हापूर
गायरान अतिक्रमण हटविण्याबाबत प्रशासनाकडून सुरु असलेल्या कारवाईबाबत करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी कोल्हापूर येथे खासदार संजय मंडलिक (MP Sanjay Mandlik) यांची भेट घेतली. यावेळी अतिक्रमण निर्मूलनप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांची लवकरच भेट घेणार असल्याची ग्वाही खासदार मंडलिक यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास सव्वा लाख कुटुंबे म्हणजेच सर्वसाधारण सहा लाख लोक बेघर होणार आहेत. त्या सर्व लोकांच्या निवाऱ्याची जबाबदारी प्रथम शासनाने घ्यावी. तसेच स्वतःचे राहते घर जाणार या भीतीपोटी ते लोक आत्महत्याही करण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ज्या वेळी पूर परिस्थिती सारखी आपत्ती निर्माण झालेली आहे, त्या त्या वेळी शासनाने त्यांची राहण्याची व्यवस्था करून त्यांना आधार दिला आहे. तसेच एकीकडे बेघर लोकांना शासनामार्फत घरकुल देऊन त्यांना आश्रय देत असताना दुसरीकडे त्यांना या आदेशानुसार बेघर करणे चुकीचा आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मुलनाची कारवाई तत्काळ थांबवण्याबाबत शासनाकडे प्रयत्न करावेत अशी मागणी शिष्टमंडळाने केली.