गणेशोत्सव महिन्यावर : गणेशमूर्ती तयार करण्यात मूर्तिकार दंग : यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांच्या हाताला वेग आला आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातील काही मूर्तीशाळांमध्ये मूर्तिकार शेवटचा हात फिरविताना दिसत आहेत. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी आणि रंगविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग पाहायला मिळत आहे. दोन वर्षांच्या कोरोना कालावधीनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशभक्त, मूर्तिकार आणि मूर्तिशाळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ग्रामीण भागात दरवषी मूर्तिकारांकडून हजारो गणेशमूर्ती घडविल्या जातात. अलीकडे तालुक्मयात साधारण 450 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्याबरोबरच घरगुती गणेशमूर्तींची प्रति÷ापना केली जाते. त्यामुळे गणेशमूर्तींना मागणीही वाढली आहे. विशेषतः कुटुंबांची संख्या वाढल्याने घरगुती गणेशमूर्तींच्या मागणीत भर पडली आहे. ग्रामीण भागातील केदनूर, मण्णीकेरी, हंदिगनूर, अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते आदी गावांतून गणेशमूर्ती घडताना दिसत आहेत. शाडू व इतर साहित्यापासून आकर्षक व सुबक गणेशमूर्तींना आकार मिळत आहे. मागील दोन वर्षात गणेशमूर्तिकारांना कोरोनाचा फटका बसला होता. मात्र, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने मूर्तीशाळांमध्ये उत्साही वातावरण आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक
ग्रामीण भागात घरगुती गणेशमूर्तींची संख्या वाढत आहे. सर्रास मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविल्या जात आहेत. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज काही नागरिकांतून व्यक्त होत आहे. वाढत्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे विहिरी, तलाव आणि नाल्यांमधील पाणी दूषित होत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा पायंडा घालणे आवश्यक आहे. अलीकडे ग्रामीण भागातही जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत आहे. या समस्येवर गणेशभक्तांनीच मार्ग काढणे आवश्यक आहे.
बाहेरून येणाऱया मूर्तींमुळे फटका
ग्रामीण भागात बाहेरून गणेशमूर्ती विक्रीसाठी येत आहेत. त्यामुळे स्थानिक मूर्तिकारांना आर्थिक फटका बसत आहे. आजही काही गावांमध्ये गणेशमूर्तिकारांची संख्या टिकून आहे. गणेशमूर्तिकार दरवषी हजारो मूर्ती तयार करतात. मात्र, बाहेरून गणेशमूर्ती विक्रीसाठी येत असल्याने स्थानिक मूर्तिकारांना फटका बसत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. काही लोहार कारागिर पारंपरिक पद्धतीने आजदेखील सुबक गणेशमूर्ती बनवत आहेत. मात्र, कोल्हापूर आणि इतर ठिकाणांहून मूर्ती येत असल्याने स्थानिक मूर्तिकारांच्या कलेला धोका निर्माण होत आहे.
ग्राहकांचा कल पीओपी मूर्तींकडे
आमच्या आजोबांपासून गणेशमूर्ती बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय करतो. दरवषी लहान-मोठय़ा हजारो गणेशमूर्ती तयार करतो. शाडूच्या मूर्तींसाठी अधिक वेळ लागतो. शाडूच्या मूर्ती बनविल्या तरी ग्राहकांचा कल पीओपी मूर्तींकडे आहे. यंदा 10 सार्वजनिक आणि 1500 हून अधिक घरगुती गणेशमूर्ती बनवत आहोत. साधारण 800 ते 2000 रुपयांपर्यंत गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. मात्र, बाहेरून विक्रीसाठी येणाऱया गणेशमूर्तींमुळे फटका बसत आहे.
–शट्टू लोहार (गणेश मूर्तिकार, केदनूर)