वास्को : लहान मुलांचा वापर करून दुकानांमध्ये चोऱ्या करणाऱ्या एका टोळक्याला वास्को पोलिसांनी अटक केली आहे. यात सात महिलांचा समावेश असून त्यांच्या ताब्यातील दोघा लहान मुलांना अपनाघरमध्ये ठेवण्यात पाठवण्यात आले आहे. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान बायणा भागातील एका मद्य विक्रीच्या दुकानावर तिघा महिलांना 7 वर्षीय मुलीचा वापर करून चोरी केली होती. त्यांना अटक करण्यात आल्यानंतर याच टोळीतील असण्याच्या संशयाने पोलिसांनी अन्य चौघां महिलांना अटक केली आहे. काल रविवारी सकाळी तिन महिला एक दोन वर्षांचा मुलगा व एक सात वर्षांची मुलगी अशा दोन लहान मुलांना कडेवर घेऊन मद्य विक्री करण्याच्या बहाण्याने त्या दुकानावर आल्या होत्या. दुकान मालकाला बोलण्यात व्यस्त ठेवून एकीने आपल्या कडेवरील सात वर्षांच्या मुलीला दुकानाच्या आत सोडले. त्या मुलीने ठरल्याप्रमाणे दुकानातील गल्ल्यात हात घातला व पाच हजार रूपये चोरले. हा प्रकार मालकाच्या नजरेस येताच तो ओरडला. त्यामुळे त्या महिलांनीही त्या मुलीला ओरडल्यासारखे केले. चोरलेले पैसे परतही केले आणि त्या महिला निघूनही गेल्या. त्यानंतर मालकाला संशय आल्याने पुन्हा पैसे मोजले असता 1800 रूपये त्या चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्यांना शोधण्यास सुरू केले असता वास्को रेल्वे स्थानकावर त्या सापडल्या. पोलिसांनी त्यांना चोरी व लहान मुलांचा चोरीसाठी वापर केल्या प्रकरणी अटक केलेली असून त्या लहान मुलांना अपनाघरमध्ये पाठवण्यात आले आहे. यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अन्य चार महिलांना अटक केलेली असून या चार महिलाही एकाच टोळीतील असण्याचा संशय आहे. आधी अटक केलेल्या महिलांची नावे नंदीनीकुमार, सुतुकला काळे व पल्लवी शिंदे अशी असून सर्वजण पुण्यातील रेल्वेस्टेशनजवळच्या झोपडपट्टीत राहणारी आहेत. पोलीस या टोळीचा अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleकाणकोणात माध्यान्ह आहाराची जबाबदारी एकट्या गटावर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.