वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱया दुसऱया लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत भारताचा माजी सलामीचा फलंदाज तसेच भाजपाचा खासदार गौतम गंभीर सहभागी होणार आहे. या स्पर्धेमध्ये विविध देशांचे माजी अव्वल क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.
2007 आणि 2011 साली विश्व चषक स्पर्धा जिंकणाऱया भारतीय संघामध्ये गौतम गंभीरचा समावेश होता. 2011 साली झालेल्या आयसीसीच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात गौतम गंभीरने 97 धावांची खेळी करत आपल्या संघाला अजिंक्मयपद मिळवून दिले होते. गौतम गंभीरने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 147 वनडे आणि 37 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. गंभीरने मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात 6 हजारपेक्षा अधिक धावा नोंदविल्या आहेत. 2012 आणि 2014 साली झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, इरफान पठाण, गौतम गंभीर, विंडीजचा ख्रिस गेल, ऑस्ट्रेलियाचे शेन वॅटसन आणि ब्रेट ली, दक्षिण आफ्रिकेचा कॅलिस हे सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा देशातील सहा प्रमुख शहरांमध्ये (कोलकाता, नवी दिल्ली, कटक, लखनौ, जोधपूर आणि राजकोट) येथे खेळविली जाणार आहे.