वाढीसोबत 26,418.84 कोटी रुपयांवर
वृत्तसंस्था/ मुंबई
हिरे आणि दागिन्यांची एकूण वार्षिक निर्यात 6.7 टक्क्यांनी वाढून ऑगस्ट 2022 मध्ये 26,418.84 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने या संदर्भात माहिती दिली आहे. (जीजेइपीसी)
जीजेइपीसाच्या मते, ऑगस्ट 2021 मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात 24,749.69 कोटी रुपये होती. यावर्षी ऑगस्टमध्ये कट आणि पॉलिश्ड डायमंडची (सीपीडी) एकूण निर्यात 0.84 टक्क्यांनी घसरून 14,955.8 कोटी रुपयांची झाली. ऑगस्ट 2021 मध्ये ती 15,082.28 कोटी रुपयांची होती.
एप्रिल-ऑगस्ट 2022 दरम्यान सीपीडीची एकूण निव्वळ निर्यात 1.59 टक्क्यांनी वाढून 78,697.84 कोटी रुपयांची झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीत 77,465.26 कोटी रुपयांवर होती. जीजेइपीसी अध्यक्ष विपुल शाह म्हणाले, ‘गेल्या दोन महिन्यांपासून चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे सीपीडी निर्यातीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. रशिया युक्रेनमधील संघर्षाचाही काही प्रमाणात हिऱयांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.