अर्ध्यालिटर दुध पिशवीरू. 2ने तरहायपॅट रू 5 ने
फोंडा
गोवा राज्य सहकारी दुध उत्पादक संघ म्हणजेच गोवा डेअरीतर्फे जानेवारी 21 पासून दुध दर महागणार असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. ग्राहकांसाठी विक्री उपलब्ध असलेल्या अर्ध्या लिटरच्या पिशवीवर दोन रूपयांनी वाढ केलेली असून हायपॅट पिशवीवर प्रति लिटर रू. 5 दुधदरवाढ करण्यात आलेली आहे. जानेवारी महिन्याअंती अर्धा लिटर दुध पिशवी रू. 29 तर हायपॅट पिशवीसाठी रू. 67 अशी दर लागू करण्यात येणार आहे.
वाढती महंगाई, वाहतूक दरात वाढ, कच्चा मालात झालेल्या दरवाढीमूळे गोवा डेअरीला प्रचंड नुकसानी सोसावी लागत असल्यामुळे ही दरवाढ करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नवीन वाढविलेल्या दरानुसार गोवा डेअरीचे दुधाची किंमत अशी असणार आहे.
गोवा डेअरीचे दुध जुना दर नवीन दर
स्टॅन्डर्ड दुध (500) रू.27 रू.29
हायपॅट दुध (1000) रू. 62 रू.67
गायीचे दुध (500) रू.25 रू.27
टोनड मिल्क (475) रू. 22 रू.25