मोठ्या भक्तीभावाने श्री गणेशाची आराधना
बेळगाव:बेळगाव शहर व परिसरात काल मंगळवारी अत्यंत जल्लोषात श्री गजाननाचे आगमन झाले. बेळगावच्या अनेक शासकीय कार्यालयांमध्येही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव भक्ती भावात साजरा होत आहे. शहापूर पोलीस स्थानकात देखील प्रत्येक वर्षी परंपरेनुसार गणेशोत्सव भक्तिभावात साजरा केला जातो.
यंदा शहापूरच्या पोलीस स्थानकात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाला सुवर्ण महोत्सवी वर्षाची परंपरा लाभली असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या भक्ती-भावाने गणेशोत्सव साजरा केला. यंदा सातव्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.