सव्वाशे स्पर्धकांचा समावेश : हर्क्युलस स्पर्धेचे आयोजन
बेळगाव : मराठा युवक संघ व बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कै. एल. आर. पाटील यांच्या स्मरणार्थ 57 वी बेळगाव श्री व बेळगाव हर्क्युलस शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. मराठा मंदिर सभागृहात आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. अरुण किल्लेकर, माजी नगरसेवक व एस. एस. फौंडेशनचे अध्यक्ष संजय सुंठकर, दिगंबर पवार, महादेव चौगुले, संजय मोरे, शिवाजी हंडे, सदानंद शिंदोळकर, संजय चव्हाण, आनंद हंगिरगेकर, नारायण किटवाडकर, श्रीकांत देसाई, मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, मारुती देवगेकर, नेताजी जाधव, रघुनाथ बांडगी, चंद्रकांत गुंडकल, दीनकर घोरपडे, अजित सिद्दण्णावर, सुहास किल्लेकर, विश्वास पवार, आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. हनुमान मूर्तीचे पूजन दीगंबर पवार यांनी केले. संजय सुंठकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन डॉ. अरुण किल्लेकर यांनी केले. य् ाा स्पर्धेत एकूण 125 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. 55, 60, 65, 70, 75, 80, 85, व 85 वरील आठ वजनी गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यावर्षी बेळगाव हर्क्युलस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरु होती.