क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बेळगाव रोलर स्केटींग अकादमी यांच्या वतीने योगा करो निरोगी रहो, अशा घोषवाक्यासह आयोजित केलेल्या स्केटींग रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला.
गोवावेस येथील रोटरी मनपा स्पोर्ट्स अकादमी व स्केटिंग रिंकवरून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. बेळगाव शहर आणि परिसरातील सुमारे 30 शाळा आणि महाविद्यालयातील 3 ते 20 वयोगटातील स्केटींगपटूंनी यात सहभाग घेतला होता. या रॅलीत योगासनाचे महत्व व त्याचे फायदे याबद्दलचे बॅनर्स स्केटींगपटूंनी प्रदर्शित केले. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, संजीव नाईक, नामदेव मिरजकर, परशुराम मंगनाईक, सूर्यकांत हिंडलगेकर, विशाल वेसने, सक्षम जाधव आदींसह स्केटींगपटू उपस्थित होते.