सावंतवाडी/प्रतिनिधी-
सावंतवाडीभटवाडी सावंतवाडी येथील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा येथे बुधवार दिनांक 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.सकाळी व्यास पूजा व सत्यदत्त पूजा होईल. सायंकाळी आरती मंत्र पुष्प होईल. रात्रौ 9 वाजता ह. भ. प. सौ. रोहिणी माने – परांजपे पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा चे कार्यवाह रवींद्र गगनग्रास यांनी केले आहे