देहराडून / वृत्तसंस्था
केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर नोंदणीला 1 एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. 25 एप्रिलपासून हा प्रवास सुरू होणार असल्याचे उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज यांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार विशेष दक्षता घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच तीर्थयात्रेची योजना आखत असलेल्या भाविकांनाही सतर्क राहून मास्क, सॅनिटायझर आदींचा वापर करावा, असे ते म्हणाले. केदारनाथ यात्रेसाठी नोंदणी अत्यावश्यक असून ही प्रक्रिया गेल्या महिन्यापासूनच सुरू झाली आहे. इच्छुक भाविक केदारनाथला जाण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वऊपात नोंदणी करू शकतात.