प्रथम शालिनी चौगुले, द्वितीय ममता जैन यांना जाहीर
प्रतिनिधी/ बेळगाव
होळीनिमित्त तरुण भारततर्फे बेळगावमध्ये माझी स्पेशल होळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. स्पर्धेत बेळगाव विभागात प्रथम क्रमांक इनरव्हिल क्लब बेळगावच्या अध्यक्ष शालिनी चौगुले आणि द्वितीय क्रमांक ममता जैन यांना जाहीर झाला. तरुण भारतच्या संचालक रोमा ठाकुर यांच्या संकल्पनेतून या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तरुण भारत सोशल मीडियाचे तौसिफ मुजावर आणि जाहिरात प्रतिनिधी अमित कोळेकर यांच्या हस्ते शालिनी चौगुले व ममता जैन यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. शालिनी चौगुले यांनी, अशी नाविन्यपूर्ण व अनोखी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल तरुण भारतचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी रंगांचे महत्त्व समजून सांगितले. ममता जैन यांनी, खूप वर्षे झाली होळीचा आनंद घेतला नव्हता. मात्र, फक्त तरुण भारतने आयोजित केलेल्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपण होळी खेळल्याचे त्या म्हणाल्या.