प्रतिनिधी /बेळगाव
मराठी विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थी कु गणेश गोडसे याने एसएसएलसी बोर्ड परीक्षेत 96 टक्के गुण घेऊन उत्तुंग यश मिळविले, पण या यशात रक्ताच्या कर्करोगाने अडथळा निर्माण केला. सध्या गणेशवर केएलई इस्पितळात कर्करोगावर उपचार सुरू आहेत. त्याच्या या वैद्यकीय उपचारासाठी शाळेने सर्व आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, हितचिंतक यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला व सर्वांनी मिळून रुपये 3,50,000/- इतकी मोठी रक्कम शाळेत जमा केली. ही रक्कम आज शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा सुधारणा समिती सदस्य यांच्या हस्ते गणेशचे बाबा परशराम गोडसे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली,
यावेळी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष अनंत जाधव, सदस्य सुरेश पाटील, विनायक जाधव, मुख्याध्यापक इंद्रजीत मोरे, गजानन सावंत, नम्रता पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.