सहाय्यक आयुक्तपदी सना गुलवानी नियुक्त
वृत्तसंस्था/ लाहोर
डॉ. सना रामचंद्र गुलवानी या पाकिस्तानी पंजाबच्या हसन अब्दाल शहराच्या सहाय्यक आयुक्त तसेच प्रशासक म्हणून नियुक्त झाल्या आहेत. सना यांनी स्वतःच्या पहिल्या प्रयत्नातच सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण होत पाक प्रशासकीय सेवेत प्रवेश मिळविला आहे. या पदावर पोहोचणारी सना ही पहिली हिंदू महिला ठरली आहे.
पाकिस्तानात हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय असला तरीही त्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. सिंध प्रांतातील शिकारपूर शहरात राहणाऱया सनाने यापूर्वी डॉक्टर होत आईवडिलांची इच्छा पूर्ण केली होती. प्रशासकीय अधिकारी होणारी पहिली हिंदू महिला मी आहे की नाही हे माहित नाही. परंतु माझ्या समुदायातील कुठलीही महिला या परीक्षेत सामील झाल्याचेही मी ऐकले नव्हते असे सना गुलवानीने सांगितले आहे.
सनाने 2016 मध्ये शहीद मोहतरमा बेनझीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतरच तिने सीएसएस परीक्षेची तयारी सुरू करत त्यात यश मिळविले आहे.
पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात वसलेली आहे. 1998 मध्ये पाकिस्तानची एकूण लोकसंख्या 13.23 कोटी होती. त्यातील 1.6 टक्के म्हणजेच 21.11 लाख इतके हिंदूंचे प्रमाण हेते. 1998 मध्ये पाकिस्तानात 96.3 टक्के लोकसंख्या मुस्लीम तर 3.7 टक्के लोकसंख्या बिगरमुस्लीम होती. तर 2017