प्रतिनिधी /पर्वरी
गोवा हेडमास्टर असोसिएशनने या वषी घेतलेल्या गोवा टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पर्वरी येथील संत गाडगेबाबा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून केदारेश्वर सिनाई नार्वेकर हे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर अखिल गोमंतक राजक समाजाचे सचिव दत्ता विष्णू बोरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव खारवी यांनी केले तर मारयीनो वालादालीस यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
सुरवातीला म्हाळसाकांत देशपांडे यांनी गोवा टेलेंट स्पर्धेचा रिपोर्ट सादर केला. यावषी या परीक्षेसाठी 6644 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती व 5700 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. तद्न?तर या या परीक्षेतील यशस्वी झालेल्या प्रत्येक इयत्तेतील प्रथम पंचवीस विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रश्मी डिसोजा (इयत्ता सातवी), चेतन कुबल (इयत्ता आठवी) सिस्टर फ्लोरी रोड्रिक्स ( इयत्ता नववी) तुळशीदास देसाई(इयत्ता दहावी) यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे नावे जाहीर केली.
या परीक्षेत प्रत्येक इयत्तेतील प्रथम पाच क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे. अस्मी वाडजी, ईशानी देसाई, भुमी नाईक, ईशीता देसाई, बायडेन वाझ ( इयत्ता सातवी) विघ्न?श शेटय़?, पियुश गावकर, श्रुती उपाध्ये, अमोघ सावईकर, प्रणाम्य भट (इयत्ता आठवी) खुशी काडोली, चिन्मय झोरे, आदीश्री कोर्डे, आश्विन राजी, श्रीया कुमारी (इयत्ता नववी) स्कार्लेट फर्ना?डिस, प्रीत भाटी, अद्वैत मुदारस, नुपूर सिनाई नार्वेकर, नादीश सावंत (इयत्ता दहावी) तर असोसिएशन तर्फे घेतलेल्या निबंध लेखन स्पर्धेत समीर गावकर (इंग्रजी प्रथम क्रमांक), रिया नाईक (हिंदी प्रथम क्रमांक), रेषा शेटगावकर(कोकणी प्रथम), सिद्धी नाईक गावकर (मराठी प्रथम) यांनी बक्षीसे प्राप्त केली. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे सिस्टर लिब्रेटा फर्ना?डिस यांनी जाहीर केली.
सत्कार सोहळय़ानंतर बोलताना केदारेश्वर नार्वेकर म्हणाले की या परीक्षेमुळे विषयातील सगळय़ा कॉन्स?प्ट योग्यरितीने मुलांना समजले जातात व युपीएससीच्या तोडीची ही परीक्षा आहे. तर विष्णू बोरकर म्हणाले की गोवा हेडमास्टर असोसिएशनला आपले सदैव सहकार्य राहील. त्यांना जेव्हा जेव्हा गरज भासेल त्यांना या सभागृहाचे दार सतत उघडे असेल. यावेळी संत गाडगेबाबा सभागृहाचे फाउंडर मेंबर रमाकांत तांबोसकर हेही उपस्थित होते.
शेवटी गोवा हेडमास्टर असोसिएशनचे सचिव एरवीन कुलासो यांनी आभार मानले. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी सज्जन फडते, सचिन पाटील यांनी व असोसिएशनच्या सगळय़ा सदस्यांनी खूप मेहनत घेतली.