डिचोली आदर्श मतदारसंघ बनविणार. अपप्रचाराला बळी पडू नका, सुचना समस्या थेट आपल्याकडे मांडा. आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांचे आवाहन. विधानसभा विजयाचा “विजयोत्सव” साजरा.
प्रतिनिधी /डिचोली
डिचोली मतदारसंघातील माझे असंख्य कार्यकर्ते हितचिंतक यां?नी अखंडीतपणे केलेले समर्पित कार्य, मतदारसंघातील माता भगिनी, वृध्द, युवा यां?नी ठेवलेला विश्वास आणि केलेल्या विजयाच्या निर्धाराने काम यामुळेच आज डिचोली मतदारसंघात आपण विजयाचे लक्ष्य साध्य करू शकलो. हा विजय माझा एकटय़ाचा नसून हा विजय सर्व कार्यकर्ते, लोकांच्या समर्पित कार्याचा आहे. हा लोकांचा विश्वास सार्थ ठरविताना डिचोली मतदारसंघासाठी मोठी कामगिरी बजावण्याचे आपण स्वप्न बाळगले असून राज्यातील एक आदर्श मतदारसंघ बनविण्यासाठी आपण अहोरात्र झटणार, असे आश्वासन डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी मुळगाव येथे केले.
मुळगाव येथील डि लिला ओपन एयरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आमदार डॉ चंद्रकांत शेटय़? यांच्या “विजयोत्सव” या लोकांप्रती खास कृतज्ञता व्यक्त करणाऱया कार्यक्रमात डॉ. शेटय़? बोलत होते. यावेळी व्यासपीठावर त्यांची पत्नी डॉ. सौ. भाग्यश्री शेटय़? यांची उपस्थिती होती.
डिचोली मतदारसंघात विजयी झाल्यानंतर आता आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. आणि लोकांच्या अपेक्षाही अपल्याकडून खुप वाढल्या आहेत. हे काम करीत असताना विरोधकांकडून होणाऱया अपप्रचाराला मात्र बळी पडू नका, निवडणुकीपूर्वी कोणी अपप्रचाराला बळी पडले नाहीत. तर आताही पडणारी नाही. याचा आपल्याला ठाम विश्वास आहे. कोणीही काहीही सांगितल्यास तुम्ही स्वतः ऐका, पहा आणि नंतरच निर्णय घ्या. कोणतीही सुचना किंवा सल्ला असल्यास थेट आपणाशी संपर्क साधा. राजकारण हा आपला छंद नसून राजकारणातून समाजकारण सक्षम बनविण्यासाठी आपण राजकारणात आलो आहे. त्यात डिचोली मतदारसंघातील जनतेची मोठी मदत पाहिजे. असे आमदार डॉ. शेटय़? पुढे म्हणाले.
निवडून आल्यानंतर डिचोलीच्या विकासाचाच ध्यास आपण मनात ठेवला असून निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने सत्यात उतरविण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. आम्ही आश्वासन दिलेली सर्व कामे एका रात्रीत होऊ शकत नाही. तर टप्प्या टप्प्याने सर्व कामे होणार आहेत. डिचोली मतदारसंघात विविध कामांना गती मिळाली आहे. बसस्थानकाचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. तसेच इतरही कामांमध्ये वेग आलेला आहे. कमी बोलून जास्त काम करून दाखविण्यावर आपण सदैव भर देतो. आपल्या कामातही हिच किमया आपण बजावली आहे, तीच किमया आमदार म्हणून साध्य करणार.
डिचोली मतदारसंघाचा बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण गांभिर्याने दक्ष घातले आहे. लाटंबार्से औद्योगिक वसाहत लवकरात लवकर कार्यान्वति व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरूच असून लवकरच उद्योग मंत्री व औद्योगिक महामंडळाचे अध्यक्ष यांच्यासमवेत लाटंबार्से औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आणि पुढील प्रक्रियेला जोर देणार आहे. असेही आश्वासन आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांनी दिले.
या विजयोत्सव कार्यक्रमात आमदार डॉ. शेटय़? यांनी व्यासपीठावर राहून शुभेच्छा न स्विकारता या सोहळय़ास उपस्थित लोकांच्या मध्ये जाऊन त्यांनी भेट दिली व कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळय़ास मोठय़ा संख्येने लोकांची उपस्थिती होती.