बेळगाव : विधान परिषदेच्या सभापतीपदी माजी सभापती बसवराज होरट्टी यांची निवड निश्चित झाली आहे. मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचा एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड बुधवारी जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र उपस्थित होते. विद्यमान सभापती रघुनाथ मलकापुरे यांनाच मुदतवाढ मिळावी, अशी मागणी वाढली होती. हायकमांडने त्यांची मनधरणी केली. त्यामुळे बसवराज होरट्टी यांचा मार्ग मोकळा झाला असून बुधवारपासून सभापतीपदावरून ते कामकाज पाहणार आहेत.
Previous Articleसीमाप्रश्नाचा ठराव आज मांडणार
Next Article सुवर्णसौधवर धडकले भगवे वादळ’
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.