वृत्तसंस्था/ कतार
डब्ल्यूटीए टूरवरील शनिवारी येथे झालेल्या कतार खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावताना अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा पराभव केला.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्वायटेकने पेगुलाचा 6-3, 6-0 अशा सरळ सेटस्मध्ये फडशा पाडला. स्वायटेकने सलग दुसऱ्या ही स्पर्धा जिंकली आहे. 2023 टेनिस हंगामातील स्वायटेकचे हे पहिले तर तिच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील 12 वे विजेतेपद आहे.