अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा रशियाला पुन्हा इशारा ः युक्रेननंतर पोलंड दौऱयावर दाखल
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युक्रेन युद्धाबाबत केलेल्या वक्तव्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अमेरिका आणि नाटो आजपर्यंत युपेनसोबत असून भविष्यातही युक्रेनला आवश्यक मदत पुरविली जाईल, असे बायडेन यांनी मंगळवारी उशिरा पोलंडमध्ये जाहीर केले. रशियन सैन्याने अत्याचार केले आहेत. तसेच युद्धकाळामध्ये महिलांवर बलात्कार हे हत्यार म्हणून वापरले जात असल्याचा संदर्भ देतानाच रशिया कधीही युपेन जिंकू शकणार नाही, असे बायडेन म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सोमवारी अचानक युक्रेनला भेट दिल्यानंतर मंगळवारी ते पोलंडला पोहोचले. येथे त्यांनी एका सभेला संबोधित केले. याचदरम्यान मंगळवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाने सुरुवातीला युद्ध टाळण्यासाठी अनेक राजनैतिक प्रयत्न केले, परंतु नाटो आणि अमेरिकेने त्यांना यश मिळू दिले नाही. आम्हाला अजूनही चर्चा हवी आहे, मात्र त्यासाठी अटी मान्य नाहीत, असे पुतिन यांनी म्हटले होते. 24 फेब्रुवारीला रशिया-युपेन युद्धाला एक वर्ष पूर्ण होत आहे.
कठोर शब्दात रशियाला ठणकावले
अमेरिका किंवा युरोपमधील लोकांना रशियाचा नाश करायचा नाही. रशियाने युक्रेनच्या मुलांचे भविष्य हिरावून घेतले. रेल्वे, शाळा, रुग्णालये आणि अनाथालयांवर बॉम्बस्फोट झाले. या गोष्टींकडे दुर्लक्ष कसे करायचे. युपेनला साथ देणे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून रशिया युक्रेनवर कधीही विजय मिळवू शकत नाही, असे बाडडेन म्हणाले. अमेरिका युपेनच्या पाठीशी सदैव आणि प्रत्येक वेळी उभी आहे यात शंका नाही. तसेच नाटोमध्ये विभाजन शक्मय नाही. आम्ही न थांबता आणि खचून न जाता युपेनला मदत करत राहू असे सांगतानाच युक्रेनवर कब्जा करण्यासाठी पुतिन यांनी युद्धाचे अस्त्र बाहेर काढल्याचा दावाही बायडेन यांनी केला आहे. त्याचबरोबर युक्रेनवरील हल्ला ही केवळ युपेनचीच नव्हे, तर संपूर्ण जगाची परीक्षा असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले.