वृत्तसंस्था/ गंगटोक
केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शाह हे शुक्रवारी सिक्कीमची राजधानी गंगटोक येथे पोहोचले. या दौऱयात त्यांनी राजभवन येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या तैलचित्राचे अनावरण केले आहे. तसेच गंगटोक येथे आयोजित पूर्व आणि ईशान्य क्षेत्र डेअरी सहकारी संमेलनाचे उद्घाटन त्यांनी केले आहे. नरेंद्र मोदी सरकारने सुमारे 65 हजार सक्रीय प्राथमिक कृषीकर्ज समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 वर्षांमध्ये प्रत्येक गावात एक डेअरी स्थापन करण्यात येणार आहे. सहकाराच्या माध्यमातून देशातील शेतकरी, शिल्पकार, मच्छिमार, आदिवासींना सशक्त करण्याचे काम केले जाणार आहे. मोदी सरकार आल्यावर ईशान्येत खऱया अर्थाने विकास सुरू झाल्याचे उद्गार शाह यांनी काढले आहेत.