चिंबल येथील घटना, चार संशयितांना अटक, मालमत्तेच्या वादातून उडाली ठिणगी
प्रतिनिधी / पणजी
चिंबल येथे मालमत्तेच्या वादातून दोन भावांमध्ये झालेल्या भांडणात एका भावाच्या मेहुण्याने दुसऱ्या भावाच्या मेहुण्याचा सुरा खूपसून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली असून ओल्ड गोवा पोलिसांनी या प्रकरणी चार संशयितांना अटक केली आहे. संशयितांच्या विरोधात भादंसं 302, 324, 504, 506 कलमाखाली तसेच बाल हक्क कायदा 8 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयितांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या व्यक्तीचे नाव मुरगन उर्फ बल्लू मंजुनाथ गवंडर असे आहे तर खून प्रकरणात अटक केलेल्या संशयितांमध्ये लिंगनाथ पालकर, प्रतीक्षा गवंडर, परशुराम गवंडर आणि हेमंत पालकर यांचा समावेश आहे. या प्रकणी दीपेश माने यांनी तक्रार दाखल केली.
संशयितांचे घटनास्थळावरून पलायन
बुधवारी रात्री संशयितांनी तक्रारदाराच्या पत्नीला शिवीगाळ करणे सुऊ केले. त्यावेळी त्यांचा 17 वर्षीय मुलाने मध्यस्थी केल्याने त्यालाही मारहाण करण्यात आली. त्यात तो जखमी झाला होता. त्यानंतर संशयितांनी मुरगन उर्फ बल्लू मंजुनाथ गवंडर याच्यावर हल्ला केला. संशयित लिंगनाथ पालकर यांनी त्याच्या छातीत सूरा खूपसल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पलायने केले. याबाबत माहिती मिळताच ओल्ड गोवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा करून संशयितांना अटक करण्याचे काम त्वरित हाती घेतले.
चारही संशयितांना घेतले ताब्यात
दरम्यान, ओल्ड गोवा पोलिसांची चार पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली. नाकाबंदी केल्यानंतर प्रतीक्षा गवंडर, परशुराम गवंडर व लिंगनाथ पालकर यांना गुऊवारी पहाटे अटक करण्यात आली. संशयित हेमंत पालकर पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. तो साखळी मार्गे चोर्ला घाटाच्या दिशेने पळून जात असता त्यालाही अटक करण्यात आली. ओल्ड गोवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.