मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही : गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईचा शुभारंभ
प्रतिनिधी / पणजी
गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते पर्वरी येथे मंत्रालयात करण्यात आला. येत्या 1 ऑगस्टपर्यंत म्हणजे दोन महिन्यात सर्व खात्यांनी त्यांना भरतीसाठी हव्या असलेल्या जागांची माहिती पाठवावी. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जाहिराती देऊन नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये आयोगामार्फत भरती करणे सुऊ होणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून कोणावरही अन्याय न होता पारदर्शक पद्धतीने भरती होईल, अशी ग्वाही डॉ. सावंत यांनी दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, सदर वेबसाईट मराठी, कोकणी, इंग्रजी अशा तीन भाषेत असून तिचा पत्ता gssम्.gद.gदन्.ग्ह असा आहे. विविध सरकारी खात्यात खूप पदे रिकामी असून त्या सर्व पदांसाठी एकत्रितपणे स्पर्धात्मक परीक्षा आयोगामार्फत घेण्यात येणार असून गोवा लोकसेवा आयोगाच्या क्षेत्रातील पदे सोडून इतर सर्व पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे भरती करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
पोलीस, अग्निशामक दलातील भरती करताना प्रथम शारीरिक चाचणी होणार असून त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर आयोगाची स्पर्धात्मक परीक्षा द्यावी लागणार आहे. कर्मचारी भरती आयोगाचे नियम निश्चित करण्यात आल्या असून त्यांचाही अंतर्भाव वेबसाईटमध्ये समाविष्ट आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेड, उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ, गोवा विद्यापीठातील भरती देखील त्यांची मागणी असल्यास आयोगामार्फत करता येऊ शकते. पाटो – पणजी येथील स्पेस बिल्डींगमध्ये सहाव्या मजल्यावर कमिशनचे कार्यालय सुऊ करण्यात आले असून त्यातील सर्व कर्मचारी वर्गांचे आपण अभिनंदन करतो, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले. हा कमिशनचा विषय अनेक वर्षे प्रलंबित होता, तो एकदाचा मार्गी लागला म्हणून डॉ. सावंत यांनी समाधान प्रकट केले. कमिशनचे अध्यक्ष कांदावेल्लू व इतर पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.
भरती प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार
सरकारी विविध खात्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत, अशी माहिती डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या जाहिराती आणि त्यांची सुरु असलेली भरती प्रक्रिया 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतरची सर्व भरती प्रक्रिया आयोगामार्फत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यात पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते भरतीचा अंतर्भाव आहे. सर्व पदांसाठी एकच परीक्षा घेण्यात येणार असून कमी पदांची भरती प्रथम व जास्त पदांची भरती नंतर करण्यात येणार आहे. सर्व पदांच्या भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात येणार असून आयोग ते काम करणार असल्याचे ते म्हणाले.