पणजी : अभिवृद्ध या स्वयंसेवी संस्थेने कन्व्हेन्शन सेंटर, विस्तार इस्टेट, हेरिटेज एरेस, मळा, पणजी, गोवा येथे दि. 24 मार्च ते 2 एप्रिल या 10 दिवसांच्या अभिवृद्धी सिल्क इंडिया एक्सपो 2023 चे उद्घाटन बाल न्यायालयाच्या पीठासीन अधिकारी, (जिल्हा न्यायाधीश संवर्ग) सायनारा टेलेस लाड यांनी केले. समिक्षा करमळकर हरजी, मिसेस गोवा 2017 या अतिथी होत्या. प्रमुख पाहुण्या लाड यांनी सर्व स्टॉल्सची पाहणी करून आनंद व्यक्त केला. विविध राज्यातील विणकरांनी सिल्कमधील डिझाइन्सचे प्रदर्शन केले आहे. रेशीम हे युगानुयुगे सर्वात जुने फॅब्रिक आहे आणि मलबारी रेशीम आणि टसर रेशीम हे रेशीम कापडांमध्ये सर्वात जुने आहे. जम्मू काश्मीरपासून ते तामिळनाडूपर्यंतच्या स्टॉलमध्ये विविध पोत आणि रंगांसह रेशीम सामग्रीचा संग्रह आहे. त्यांच्या ड्रेसिंग रूममध्ये आणखी काही संग्रह जोडणे चांगले आहे, असे टेलेस लाड म्हणाल्या. समिक्षा करमळकर यांनीही स्टॉलला भेट देवून आनंद व्यक्त केला. लग्नाचा हंगाम येत असल्याने, गोवावासीयांसाठी दर्जेदार रेशीम वस्तू खरेदी करण्याची ही एक चांगली संधी आहे. विविध सिल्क साडी विणकर, हातमाग क्लस्टर्स आणि रेशीम सहकारी संस्था त्यांच्या उत्पादनांचा प्रदर्शनात समावेश आहे. संस्थेचा हेतू विणकर आणि कारागिरांना नियंत्रक न करता थेट ग्राहकांपर्यंत उत्पादने उपलब्ध करून देणे आणि पोहोचवणे हा हेतू असल्याचे स्वागतपर भाषणात अभिवृद्धीचे संघटक टी. अभिनंद म्हणाले.
Previous Articleकुंकळ्ळीत त्रिवेणी कला संघाचा चित्ररथ प्रथम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.