बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा स्वत:च्या ओटीटी पदार्पणावरून चर्चेत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीची आगामी वेबसीरिज ‘इंडियन पोलीस फोर्स’द्वारे सिद्धार्थ डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. याचदरम्यान या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. रोहित शेट्टी ‘इंडियन पोलीस फोर्स’द्वारे स्वत:च्या कॉर्प युनिव्हर्सचा विस्तार करत आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओने या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. यानुसार ही सीरिज 19 जानेवारी रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. पोलीस स्मृती दिवस विचारात घेत निर्माते ही वेबसीरिज प्रदर्शित करणार आहेत. सिद्धार्थसोबत या सीरिजमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. याचबरोबर विवेक ओबेरॉय देखील यात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या सीरिजच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे अनेकदा जखमी झाले होते.
Previous Articleकाँग्रेस नेत्याची भेट घेण्यास आझम यांचा नकार
Next Article काश्मीर सीमेवर हाय अलर्ट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.