जिल्हाधिकारी कार्यालयात प्रात्यक्षिक : हैदराबाद येथील ईसीआय कंपनीकडून ईव्हीएमचा पुरवठा : तपासणीत सर्वच यंत्रे दोषरहीत
बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम यंत्रांच् ााr माहिती देऊन मतदानाबाबतची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांच्यासमोर ईव्हीएम, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट यांच्या कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसल्याचे यावेळी सर्व प्रतिनिधींना दाखवून देण्यात आले. पहिली प्रात्यक्षिक प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली असून य् ाावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील य् ाांनी निवडणुकीबाबतची माहितीदेखील दिली आहे. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 4 हजार 434 मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीसाठी 5 हजार 321 बॅलेट युनिट, 5 हजार 321 कंट्रोल युनिट आणि 5 हजार 765 व्हीव्हीपॅट लागणार आहेत. मात्र त्यापेक्षा अधिक बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 8 हजार 252 बॅलेट युनिट, 6 हजार 740 कंट्रोल युनिट, 5 हजार 848 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आता याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली आहे. हैदराबाद येथील ईसीआय कंपनीने ईव्हीएमचा पुरवठा केला असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही अनेकवेळा या सर्व यंत्रणांची पडताळणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधेंना याची माहिती देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने संबंधित मतदान केंद्रांवर निवडणूक वेळेपूर्वी ही सर्व यंत्रे पाठविली जाणार आहेत. तत्पूर्वी आणखी एकदा सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर या यंत्रांबाबतचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ही सर्व यंत्रे निवडणूक आयोगाच्या गोदामामध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये ठेवण्यात आली आहेत. पुढील प्रात्यक्षिक करताना निवडणूक अधिकाऱ्यांबरोबरच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झालेल्या या प्रात्यक्षिकावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी याचबरोबर अप्परजिल्हाधिकारी के. टी. शांताला तसेच 18 विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक अधिकारी उपस्थित होते. या सर्वांना यंत्रांबाबतची खात्री पटवून देण्यात आली आहे.