चिक्कबळ्ळापूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी निघालेली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची हायटेक बस निवडणूक अधिकाऱ्यांनी महामार्गावर अडवून तपासणी केली. मुख्यमंत्री सुरक्षा ताफ्यासह चिक्कबळ्ळापूरकडे निघाले होते. दरम्यान, निवडणूक निरीक्षकांनी महामार्ग चेकपोस्टजवळ बस थांबवून स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने कसून तपासणी केली. यावेळी मुख्यमंत्री बसमध्ये बसून तपासणीला सहकार्य केले. दरम्यान, स्थानिकांनी सिद्धरामय्यांसोबत सेल्फी घेताना दिसून आले. चिक्कबळ्ळापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार रक्षा रामय्या यांच्या प्रचारासाठी सिद्धरामय्या जात होते. सिद्धरामय्या यांच्या प्रचारासाठी हायटेक बस तयार करण्यात आली आहे.
Previous Articleनिर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Next Article सलमान खान गोळीबारप्रकरणी आणखी एक संशयित अटकेत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.