5,000 एमएएच क्षमतेची बॅटरी ः 13 एमपी डय़ुअल कॅमेरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सॅमसंगने आपली गॅलेक्सीची ए आवृत्ती सादर करत सिरीजमधील बजेटमधील स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीच्या या फोनचे नाव सॅमसंग गॅलेक्सी ‘ए04इ’ आहे. या संदर्भात कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या मॉडेलची वैशिष्टय़े दिली आहेत. तथापि, फोनच्या उपलब्धतेची तारीख आणि किंमत यासंदर्भातली माहिती कंपनीने दिलेली नाही.
मॉडेलनुसार फोनची किमत 13,499 रुपयांपासून राहणार आहे. मात्र या संदर्भातील अधिकृत किमतीचा सर्व तपशील जाहीर करणार असल्याची अपेक्षा आहे. गॅलेक्सी ए04इ मध्ये मीडिया टेक होलियो जी 35 प्रोसेसर आहे. प्रोसेसर जवळपास 2 वर्षे जुना आहे. या फोनमध्ये फुल स्क्रीन डिस्प्ले, वॉटर ड्रॉप नॉच आणि 131 रियर कॅमेरा सेटअप असणार आहे.
कंपनीकडून जवळपास 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट आणि 5एमपी सेल्फी कॅमेरादेखील येणार आहे.
वैशिष्टय़े आणि तपशील
सदरचा हा फोन ब्लॅक, ऑरेंज कॉपर आणि लाइट ब्लू या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकता येणार आहे. याचे वजन 188 ग्रॅम आहे, मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट, 3.5 मिमी ऑडिओ जॅकपोर्ट आणि डय़ुअल सिम सपोर्ट आहे.