भीमसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बाळेकुंद्री खुर्द येथील कˆड प्राथमिक शाळेत भ्रष्टाचार झाला असून त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भीमसेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शाळेला विकासकामासाठी 3 लाख ऊपये मंजूर झाले होते. त्यामध्ये हा भ्रष्टाचार झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. बाळेकुंद्री खुर्द येथील शाळेला विविध विकासकामांसाठी 3 लाख ऊपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र तो निधी खर्च करताना कोणत्याही प्रकारची बिले न घेताच खर्च केला गेला. याबाबत शाळेमध्ये विचारण्यासाठी गेले असता उद्धट उत्तरे देण्यात आली. तेव्हा याची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शाळेच्या आवारामध्ये जेसीबीने ख•s मारण्यात आले. केवळ एक तासाचा अवधी लागणाऱ्या कामाला 10 हजार ऊपये खर्च दाखविला आहे. खेळाचे साहित्य, झाडू व इतर जे साहित्य घेतले आहे, त्यांच्या दरामध्येही मोठी तफावत केली आहे. तेव्हा याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी केली. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन दिले. यावेळी प्रविण मादार, सिद्धाप्पा चलवादी, निखील कोलकार, नहिम मुजावर, अजय शिंदे, के. आर. अक्षय व कार्यकर्ते उपस्थित होते.