केएससीए चतुर्थ श्रेणी क्रिकेट स्पर्धा
बेळगाव ; कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चतुर्थ श्रेणी क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून लक्ष्य सीसी ब संघाने एफआयटी धारवाड संघाचा 8 गड्यांनी तर के. आर. शेट्टी लायाज संघाने टीएससीए बी संघाचा 8 गड्यांनी पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. प्रशांत लायंदर व अमित यादव यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. केएससीए ऑटोनगर येथील स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एफआयटी धारवाड संघाने 27 षटकात सर्व बाद 138 धावा केल्या. त्यात रमेश जी. ने 83, शिवराम एम. ने 34 धावा केल्या. लक्ष्यतर्फे अमित यादवने 20 धावात 3, नागेंद्रने 19 धावात 2 तर सुमित व आदेश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना लक्ष्य सीसी ब संघाने 15.3 षटकात 2 गडी बाद 142 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात आदेश अर्सने 55, चेतन पी., अमित यादव यांनी प्रत्येकी 27 तर नागराजने 4 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या. एफआयटी धारवाडतर्फे अरुणने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात पीएससीए ब संघाने 29.1 षटकात 8 गडी बाद 145 धावा केल्या. त्यात देवराज के. एल. ने 12 चौकारांच्या साहाय्याने 73, वैभव के. ने 24, शुभमने 19 धावा केल्या. के. आर. शेट्टी लायाजतर्फे सलमान गोकाक व सलील रोकडे यांनी प्रत्येकी 2 तर शिवाजी पाटील, सुनील सक्री यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी लायाज संघाने 22.2 षटकात 2 गडी बाद 149 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात प्रशांत लायंदरने 59, सलील रोकडेने 8 चौकारांच्या साहाय्याने 47, राहुल शिंदेने नाबाद 30 धावा केल्या. टीएससीएतर्फे आसाजने 24 धावात 2 गडी बाद केले.