राष्ट्रीय ज्युनियर शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद, मणिपूर व कर्नाटक उपविजेते
बेळगाव : मध्यप्रदेशातील रतलाम येथे इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशन मास्टर्स व दिव्यांग संघटना आयोजित 13 व्या ज्युनियर मास्टर्स व दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र संघाने 145 गुणांसह सांघिक विजेतेपद, मणिपूरने 140 गुणांसह पहिले उपविजेतेपद तर कर्नाटकाने 130 गुणांसह दुसरे उपविजेतेपद पटकाविले आहे. तर क्षेत्रीमयुम निरज सिंग याने चॅम्पियन ऑŸफ चॅम्पियन हा मानाचा किताब पटकाविला.
रतलाम येथे झालेल्या या शरीरसौष्ठव स्पर्धेत दिव्यांग विभागात 60 किलो गटात 1) सूर्यनारायण (तेलंगणा), 2) प्रताप महेश भोसले (महाराष्ट्र), 3) भास्कर बियावास (प. बंगाल), 4) सनथ व्ही. (केरळ), 5) मलाररंजन एम. (तामिळनाडू), 60 किलोवरील गट- 1) अनित एस. एस. (केरळ), 2) देविप्रसाद (महाराष्ट्र), 3) लोकेशकुमार (उत्तराखंड), 4) वालीमहमुद (उत्तर प्रदेश), 5) महेश पाटील (महाराष्ट्र). मास्टर्स विभाग- 40 ते 50 वयोगट- 80 किलो गट- 1) अमित दीपक सिंग (महाराष्ट्र), 2) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव, कर्नाटक), 3) कृष्णकुमार डी. (तामिळनाडू), 4) अभिंद्रा दत्ता (आसाम), 5) महेंद्र कुमार पलिवाल (मध्यप्रदेश), 80 किलोवरील गट- 1) नित्यानंद कोटियान (कर्नाटक), 2) विक्रमसिंग (दिल्लवी), 3) नितेश थापा (मध्यप्रदेश), 4) सय्यद अहमद (तेलंगणा), 5) अनुप हरजा (प. बंगाल). मास्टर्स खुला गट- 1) 50 ते 60 वयोगट- 1) विरेंद्रसिंग पनवार (उत्तर प्रदेश), 2) श्रवनन हरिराम (कर्नाटक), 3) साहेबलाल छपराबंद (कर्नाटक), 4) अरुणाचलम के. (तामिळनाडू), 5) संजोग रघुवंशी (राजस्थान), 60 किलोवरील गट- 1) माणिकलाल दास (प. बंगाल), 2) सय्यद हुसेन (महाराष्ट्र), 3) रामचंद्र शहा (महाराष्ट्र), 4) ग्लानिन जोसेफ पीटर (केरळ), 5) राजेंद्र शिरोडकर (महाराष्ट्र). महिला खुला गट- 1) प्रतिभा तापियाल (उत्तराखंड), 2) अनुष्का गोस्वामी (उत्तर प्रदेश), 3) सुबिता बाणी (आसाम), 4) बबिता (पंजाब), 5) पिंकी सासमन (प. बंगाल). ज्युनियर मॉडेल फिजिक- 21 वर्षाखालील- 1) अंकिता गानी (प. बंगाल), 2) श्रेयसी मुखर्जी (प. बंगाल), 3) रिया सिंग (प. बंगाल), 4) आयेशा निधा (केरळ), 5) रिंकू रावत (राजस्थान). लेडीज मॉडेल फिजिक- 1) रेणुका मुदलियार (महाराष्ट्र), 2) बर्नाली बासू (आसाम), 3) साया बारुआ (आसाम), 4) एल. यिंगचु पोम (नागालँड), 5) निशाराणी पारेख (महाराष्ट्र). ज्युनियर गट- 55 किलो गट- 1) आकाश निंगराणी (कर्नाटक), 2) मोईरनमयुम राहुल (मणिपूर), 3) मधाब नायक (केरळ), 4) रवि अग्रवाल (उत्तर प्रदेश), 5) रिंगू नायक (ओडिशा), 60 किलो गट- 1) निर्मलकुमार शेट्टर (कर्नाटक), 2) तिलक विनोद गाडगे (महाराष्ट्र), 3) पंढरीनाथ बोंडे (महाराष्ट्र), 4) महम्मद अश्रफ के. पी. (केरळ), 5) धर्मेंद्र (हरियाणा), 65 किलो गट- 1) अर्जुन मोगले (महाराष्ट्र), 2) हर्ष गुप्ता (महाराष्ट्र), 3) अभिदेव मोहन (केरळ), 4) लोयटोंगबम नेत्रजित सिंग (मणिपूर), 5) हनिसिंग गोसाई (हरियाणा). 70 किलो गट- 1) प्रितन घोष (प. बंगाल), 2) लोंगीयम मेईतेई (मणिपूर), 3) विशाल वाघमारे (तेलंगणा), 4) थोगचम मेईतेई (मणिपूर), 5) नियास सी. के. (केरळ). 75 किलो गट- 1) नासिरुद्दीन व्ही. ए. (केरळ), 2) गिरेश मायगेरी (कर्नाटक), 3) प्रणव कोतवाल (महाराष्ट्र), 4) येंखोम ज्युपिटर सिंग (मणिपूर), 5) शैलेशकुमार (झारखंड). 75 किलोवरील गट- 1) क्षेत्रामयुम निरज सिंग (मणिपूर), 2) दीपककुमार पराशर (उत्तर प्रदेश), 3) अनिलकुमार (राजस्थान), 4) श्रीवर्धन रे•ाr (कर्नाटक), 5) गणेश हरड (महाराष्ट्र) यांनी विजेतेपद पटकाविले.
ज्युनियर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स स्पर्धेत प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकांत लढत झाली. त्यामध्ये क्षेत्रीमयुम निरज सिंग याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब पटकाविला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन व मध्यप्रदेश बॉडी बिल्डींग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.