वृत्तसंस्था/ गिजॉन (स्पेन)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पहिल्या गिजॉन पुरुषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत रशियाचा टॉप सिडेड आंद्रे रुबलेव्हने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना इव्हाश्काचा पराभव केला.
एटीपीच्या क्रमवारीत सध्या नवव्या स्थानावरील रुबलेव्हने इव्हाश्काचा 6-3, 5-7, 6-4 अशा सेटस्मध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. आता उपांत्यपूर्व फेरीत रुबलेव्हचा सामना अमेरिकेच्या टॉमी पॉलशी होणार आहे. या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेने एका सामन्यात पेद्रो कॅचिनचा 2-6, 7-5, 7-6 (7-3) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.