राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले स्वागत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कंबोडियाचे राजे नोरोडोम सिहामोनी हे पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. मंगळवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजे सिहामोनी यांची भेट घेतली आहे. यावेळी कंबोडियाच्या राजाला राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. राजे नोरोडोम हे भारताच्या तीन दिवसीय अधिकृत (29-31 मे) दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती मुर्मू अन् पंतप्रधान मोदी तसेच केंद्रीय मंत्र्यांना भेटल्यावर कंबोडियाचे राजे सिहामोनी यांनी राजघाट येथे जात महात्मा गांधी यांना पुष्पांजली अर्पण केली आहे.
भारत आणि कंबोडिया यांच्यात 1952 मध्ये प्रस्थापित राजकीय संबंधांना 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित होणाऱ्या सोहळ्यात सामील होण्यासाठी राजे सिहामोनी हे दौऱ्यावर आले आहेत. कंबोडियाच्या कुठल्याही राजाचा भारत दौरा हा सुमारे 6 दशकांनी होत आहे. यापूर्वी सध्याचे राजे सिहामोनी यांचे पिता 1963 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते.