15 जणांचा शौर्य चक्राने होणार सन्मान
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सशस्त्र दल तसेच अन्य सुरक्षा दलांमधील शूरवीरांसाठी 412 शौर्यपदकांची घोषणा करण्यात आली आहे. यात 6 शूरवीरांना कीर्ति चक्राने गौरविण्यात येणार आहेत. यातील 4 जणांचा मरणोत्तर कीर्ति चक्राने गौरव करण्यात येणार आहे. तर 15 शूरवीरांना शौर्यचक्र जाहीर झाले असून यातील दोन जणांना हा सन्मान मरणोत्तर स्वरुपात प्रदान होणार आहे.
मेजर शुभांग आणि नायक जितेंद्र सिंह यांना कीर्ति चक्राने सन्मानित केले जाणार आहे. तर मेजर आदित्य भदौरिया, कॅप्टन अरुण कुमार, कॅप्टन युद्धवीर सिंह, कॅप्टन राकेश टी. आर., नायक जसबीर सिंह (मरणोत्तर) लान्स नायक विकास चौधरी आणि कॉन्स्टेबल मुदासिर अहमद शेख (मरणोत्तर) यांना शौर्यचक्र प्रदान केले जाणार आहे.
92 शूरवीरांना सेनापदक जाहीर झाले असून यातील 4 जणांना हे पदक मरणोत्तर स्वरुपात प्रदान करण्यात येणार आहे. 29 जणांना परमविशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात येणार आहे. तीन शूरवीरांना उत्तम युद्धसेवा पदकाने सन्मानित केले जाणार आहे. तर 52 जणांचा अतिविशिष्ट सेवा पदकाने गौरव केला जाणार आहे.
मेजर शुभांग यांनी एप्रिल 2022 मध्ये जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईदरम्यान अत्यंत प्रतिकूल स्थितीत स्वतःचे टीमचे नेतृत्व केले होते. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत बॅरल ग्रेनेड लाँचरचा वापर केला होता, यात एक अधिकारी आणि दोन सैनिक जखमी झाले होते. खांद्याला गोळी लागूनही मेजर शुभांग यांनी अतुलनीय शौर्य दाखवत एका दहशतवाद्याला ठार केले होते. तर नायक जितेंद्र सिंह यांनी डिसेंबर 2021 मध्म्ये तीन मोहिमांमध्ये लीड गाइडच्या स्वरुपात असाधारण शौर्य आणि साहस दाखविले होते. या मोहिमांमध्ये 7 दहशतवादी मारले गेले होते. तसेच केंद्रीय पोलीस दलातील 4 शूरवीरांना मरणोत्तर स्वरुपात कीर्ति चक्रने गौरविले जाणार आहे.
पद्मविभूषण विजेते मान्यवर
1. बाळकृष्ण दोषी, (वास्तूआरेखन, गुजरात) (मरणोपरांत)
2. झाकीर हुसेन (तबलावादक, महाराष्ट्र)
3. एस. एम. कृष्णा (राजकारण, कर्नाटक)
4. दिलीप महालनबीस (वैद्यकीय, पश्चिम बंगाल)
5. श्रीनिवास वराधन (विज्ञान तंत्रज्ञान, अमेरिका)
6. मुलायमसिंग यादव (राजकारण, उत्तर प्रदेश) (मरणोपरांत)
पद्मभूषण विजेते मान्यवर
1. एस. एल. भैराप्पा (साहित्य, कर्नाटक)
2. कुमार मंगलम बिर्ला (व्यापार-उद्योग, महाराष्ट्र)
3. दीपक धार (विज्ञान-तंत्रज्ञान, महाराष्ट्र)
4. वाणी जयराम (गायन, तामिळनाडू)
5. स्वामी चिन्ना जीयार (अध्यात्म, तेलंगणा)
6. सुमन कल्याणपूर (गायन, महाराष्ट्र)
7. कपिल कपूर (साहित्य, दिल्ली)
8. सुधा मूर्ती (सामाजिक कार्य, कर्नाटक)
9. कमलेश पटेल (अध्यात्म, तेलंगणा)
काही पद्मश्री विजेते मान्यवर