नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू लान्स क्लुसनर यांची त्रिपुरा क्रिकेट संघटनेने आगामी देशी मोसमासाठी सल्लागारपदी नियुक्ती केली असल्याचे वृत्त एका क्रीडा वाहिनीने दिले आहे. 51 वर्षीय क्लुसनर यांच्याशी प्रतिवर्षी शंभर दिवसांचा त्यांनी करार केला आहे. रणजी संघासमवेत काम करण्याबरोबरच राज्याच्या विविध वयोगटाच्या आठ पुरुष व महिला संघांनाही ते साह्या करणार आहेत. त्रिपुरा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष तिमिर चंदा यांनी सांगितले की, क्लुसनर शनिवारी आगरतळा येथे दाखल होणार असून राज्यातील क्रिकेटपटूंच्या सर्वांगीण विकासासंदर्भात ते त्यांच्यासमवेत काम करतील. प्राथमिक टप्प्यात ते आगरतळामध्ये 20 दिवस राहून क्रिकेटपटूंचे निरीक्षण करून त्यांना मार्गदर्शन करतील, असे त्यांनी स्पष्ट केले. क्लुसनर यांनी 49 कसोटी, 171 वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले असून आयपीएलमध्ये ते 2018-19 या मोसमात दिल्ली संघाचे सल्लगार प्रशिक्षकही होते. द,आफ्रिकेतील एसए20 स्पर्धेत सध्या ते दरबान सुपरजायंट्सचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांनी दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे संघाचे फलंदाज प्रशिक्षक म्हणूनही याआधी काम पाहिले आहे. 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेवेळी ते अफगाण संघाचे प्रमुख प्रशिक्षकही होते.
Previous Articleऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीसाठी इशान किशनकडून जोरदार सराव
Next Article भारत-पाकिस्तान जेतेपदासाठी आमनेसामने
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment