कोडोली पोलीसांना दोन वर्षानतंर कासवाईला यश
वारणानगर / प्रतिनिधी
इंडियन कॅनेडियन प्रेस बिटेरियन मिशनच्या अध्यक्षासह दोन संचालकांचे बनावट राजीनामे तयार करून संदर्भ कार्यालयाला पाठवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथे एकास कोडोली पोलीसानी अटक केली . असून राकेश कालुरामजी कुवाल रा.गंगानगर धाररोड , इंदौर,मध्यप्रदेश असे याचे नांव आहे.
इंडियन केनेडियन प्रेस बिटेरियन मिशनचे अध्यक्ष दिपक नामदेव गायकवाड, संचालक शिल्पा देसाई, प्रदीप गायकवाड यांचे बनावट राजीनामे संगणकीकृत करून फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्ष दिपक गायकवाड यानी कोडोली पोलीस ठाण्यात दि. ८ जुलै २०२० ला फिर्याद दाखल केली होती या प्रकाणी तब्बल दोन वर्षानी राकेश कालुरामजी कुवाल यास पुणे येथे सापळा सूचून पकडण्यात आले आहे तर याच प्रकरणात पार्थो प्रोतीम बैध्य रा.बंगाली कॉलणी, कनाडीया रोड,रिंगरोड चौकजवळ इंदौर मध्य प्रदेश यास अद्याप अटक झालेली नाही.
आरोपी राकेश याने फिर्यादी दिपक गायकवाड यांची संमती नसताना त्यांची परस्पर खोटे राजीनामे तयार करून मंजुर केले व ROC ऑफिस मुंबई येथे बनावट तयार केलेले राजीनामे संगणीकृत करुन ऑनलाईन पध्दतीने दाखल करुन फिर्यादी व संचालक शिल्पा देसाई , प्रदीप गायकवाड यांचेपैकी कोणीही राजीनामे दिले नसताना त्यांची फसवणुक करण्याचे उददेशाने व त्यांचे बेकायदेशीररित्या नुकसान करणेचे उददेशाने बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे . सदर कपनीचे कार्यालय कोडोली येथे कार्यरत असल्यामुळे फियांद कोडोली पोलीस ठाणे येथे दिलेने गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी राकेश कुबल यास आज दि. २२ रोजी पन्हाळा न्यायालयात हजर करून त्यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शाहूवाडी विभागाचे पोलीस उपअधिक्षक रविंद्र सांळोखे, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाध्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर पवार, हावलदार नामदेव सुतार, पोलीस नाईक, प्रवीण यादव यानी आरोपी रावेश कुवाल यास पुणे येथे सापळा रचून पकडण्यात यश मिळवले.