सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरु
इचलकरंजी / प्रतिनिधी
राहत्या घरा समोर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे सुमारे दिड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसुत्र मोपेडवरुन आलेल्या चेनस्नॅचिगने हिसडा मारून घेवून पोबारा केला. ही घटना शहरातील येलाज मळ्यातील मोरे बझार शेजारी बुधवारी घडली आहे.
याबाबतची फिर्याद रुपाली नितीन पटेकरी यांनी गावभाग पोलिसात दिली आहे.रुपाली पटेकरी ही महिला राहत्या घराच्यासमोरील गेटजवळ उभ्या होत्या. यावेळी त्याच्या पाठीमागून भरधाव आलेल्या मोपेडवरील मोपेडस्वाराने त्या महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीचे सुमारे दिड तोळे वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसुत्र हिसडा मारून घेतले. धुम स्टाईलने मोपेडवरुन पसार झाला. या घडल्या प्रकाराने त्या महिलेने आरडाओरड केली. पण तिच्या घरातील व शेजारील नागरिक घराबाहेर येण्यापूर्वीच तो घटनास्थळावरून मोपेडवरुन पळून जाण्यास यशस्वी झाला. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चेनस्नॅचिग केलेला चोरटा कैद झाला का १ याकरीता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरु केली आहे.