शाहुवाडी प्रतिनिधी
पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करत असताना गौरी गणपती विसर्जन हे कृत्रिम कुंडातच करावे . गौरी गणपती विसर्जन ठिकाणी मलकापूर नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम कुंड ठेवले आहेत . त्याचा सर्वच गणेश भक्तांनी लाभ घेऊन सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक विद्या कदम यांनी केले आहे.
शनिवार 23 सप्टेंबर रोजी घरगुती गणपती व गौरी विसर्जन होणार आहे . पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत . याच माध्यमातून या वर्षी देखील शहरातील गौरी गणपती विसर्जनासाठी मलकापूर नगर परिषदेच्या वतीने शाळी व कडवी नदी नजीक कृत्रिम कुंड उपलब्ध करून ठेवले आहेत . मलकापूर नगर परिषदेच्या वतीने सोमवार पेठ , बुरुड गल्ली, मरीमाई ,मंगळवार पेठ या ठिकाणी असणाऱ्या पाणवट्याच्या ठिकाणी कृत्रिम कुंड ठेवण्यात आले आहेत .या कुंडातच गौरी गणपती व निर्माल्य विसर्जन करावे .असे आवाहन मलकापूर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक विद्या कदम यांनी केले आहे .