किरण पाटील आळते
लिंब ता. तासगाव येथे सर्वधर्म समभावचे अनोखे दर्शन घडले. लिंब येथील मोरया गणेश मंडळाकडून एका मुस्लिम दाम्पत्याच्या हस्ते गणपती मंडळाच्या सत्यनारायण पूजेला बसण्याचा मान देऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचा नारा दिला. सर्वधर्म समभावचे अनोखे दर्शन यामुळे पाहावयास मिळाले.
मुस्लिम समाजातील रज्जाक चांद पठाण व लैलाबी रज्जाक पठाण या पती-पत्नीच्या हस्ते सत्यनारायण पूजा करून नंतर सर्व मंडळातील कार्यकर्त्यांनी आरती केली व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गावातील सर्व तरुण मंडळ ग्रामस्थ उपस्थित होते. पठाण कुटुंबीय गावातील समाजकार्य असो किंवा धार्मिक कार्य ते नेहमी आनंदाने सहभागी होतात व अग्रेसर राहून काम करत.त्यांचं सार्वजनिक कामात योगदान चांगले व प्रामाणिक असते म्हणून त्यांना हा मान दिला असल्याचे मंडळाचे कार्यकर्ते दिनितकुमार पाटील व मोरया ग्रुपच्या सदस्यांनी दिली. मोरया गणेश मंडळाचे तासगाव- कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई आर.आर.पाटील व युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तासगाव तालुका कार्याध्यक्ष सचिन साहेब पाटील,प्रकाश मोहिते मांजर्डे, शुभम पाटील विसापूर यांनी भेट देऊन मंडळाचे कौतुक केले.