सुभाष नगर पंपिंग स्टेशन मधील मोटर दहा दिवसातच पुन्हा नादुरुस्त
पाचगाव वार्ताहर
सुभाष नगर पंपिंग स्टेशन मधून आर के नगर, पाचगाव परिसरातील उपनगरांना पाणीपुरवठा करण्यासाठी कार्यान्वित असणारी मोटर मंगळवारी पुन्हा नादुरुस्त झाल्यामुळे आर के नगर पाचगाव परिसरातील उपनगरांचा पाणीपुरवठा पूर्ण खंडित झाला आहे. यामुळे आर के नगर पाचगाव परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
सुभाष नगर पंपिंग स्टेशन मधून आर के नगर पाचगाव परिसरातील उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. पंधरा दिवसांपूर्वीच येथील मोटर नादुरुस्त झाली होती. यामुळे पाचगाव आर के नगर परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.
सुमारे दहा दिवसांपूर्वी ही मोटर दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्यात आली होती. ही मोटर खूप जुनी झाली आहे त्यामुळे मोटर पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करू शकत नव्हती.
मंगळवारी पुन्हा एकदा ही मोटर नादुरुस्त झाली आहे. यामुळे आर के नगर पाचगाव परिसरातील उपनगरांचा पाणीपुरवठा पुन्हा एकदा खंडित झाला आहे. आर के नगर पाचगाव परिसरातील नागरिकांची पुन्हा एकदा पाण्यासाठी भटकंती होणार आहे वारंवार मोटर नादुरुस्त होत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.