इचलकरंजी लगतच्या एका गावातील घटना; पिडीत बालिकेने विरोध करू लागल्याने संशयीत आरोपीकडून ऊसाने व दगडाने मारहाण; मारहाणीत पिडीत बालिक जखमी; महिलानी केलेल्या मारहाणीत संशयीत जखमी; पोलीस बंदोबस्तात जखमी सशयीत आरोपीवर उपचार सुरु; चंदूरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात
इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरालगतच्या एका गावातील नऊ वर्षीय बालिकेला खाऊच्या आमिषाने फुस लावून, ऊसाच्या शेतवडीमध्ये पळवून नेवून, तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. लैगिंक अत्याचाराला विरोध करणाया पिडीत बालिकेला नराधमाने दगडाने डोकीत आणि उसाने पाठीवर मारहाण करुन, गंभीर जखमी केले. ऋतिक माणिक शिंदे ( वय 22, रा. आभार फाटय़ानजीक, चंदूर, ता हातकणंगले) असे त्या नराधमाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सांयकाळच्या सुमारास उघडकीस आली असून, या घृणास्पद प्रकारानंतर संतप्त महिलानी नराधमाची चांगलीच धुलाई केल्याने जखमी झाला आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पिडीत बालिकेसह नराधमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.
पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, संशयीत आरोपी ऋतिक शिंदे हा गवंडी काम करतो आहे. त्याने शहरालगतच्या एका गावातील मित्राची नऊ वर्षीय पुतणी घराशेजारी खेळत होती. त्या बालिकेला तुझे तात्या तुला बोलवत आहेत. तसेच खाऊ देण्याचे आमिषाने बोलावून घेतले. चंदुर येथील माळभाग परिसरातील ऊसाच्या शेतात नेले. तेथे त्या बालिकेवर त्याने लैगिंक अत्याचार केला. यावेळी पिडीत बालिकेने विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडून संशयीत आरोपी ऋतिकने पिडीतेला ऊसाच्या बुडक्याने बेदम मारहाण करीत, डोक्यात दगड घातला. या घडल्या प्रकारानंतर जखमी पिडीत बालिका मोठ मोठय़ाने ओरडत नराधमाच्या हातातून कशी बशी सुटका करुन घेत ऊसाच्या शेतवडीमधून बाहेर आली. हा प्रकार परिसरातील नागरिकाच्या निदर्शनास आला. त्यांनी जखमी बालिकेला उपचारासाठी दुचाकीवरून त्वरीत आयजीएम रुग्णालयात दाखल केले.
जखमी पिडीतेने दिलेल्या माहिती वरुन नागरिकांनी संशयीत आरोपी ऋतिकचा शोध घेतला. संतप्त ग्रामस्थांनी विशेषता महिलांनी त्यांची येथेच्छ धुलाई केली. त्यामुळे तो जखमी झाला. या घडल्या घटनेची माहिती मिळताच चंदूरचे पोलीस पाटील राहुल वाघमोडे, शिवाजीनगर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. संतप्त जमावाच्या तावडीतून संशयीत आरोपीची सुटका केली. त्याला ही उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरा जखमी पिडीत बालिकेवर पुढील उपचारासाठी कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आहे. तर पोलिसांनी जखमी संशयीत आरोपीस ताब्यात घेतले असून, त्याच्यावर आयजीएम रुग्णालयात पोलीस बंदोबस्तात उपचार सुरु आहेत.