गोकुळ शिरगाव वार्ताहर
कोल्हापूर ते बेंगलोर, बेंगलोर ते कोल्हापूर, कोईमत्तूर ते कोल्हापूर व्हाया बेंगलोर, कोल्हापूर ते कोईमत्तूर व्हाया बेंगलोर अशा पद्धतीची इंडिगो ची एअर विमान लाईन सेवा शुक्रवार दिनांक 13 पासून सलग सुरू राहील. असे वेळापत्रक आज इंडिगो एअरलाइन्सने प्रसिद्ध केले आहे.
यामध्ये कोल्हापूर ते बेंगलोर हे विमान सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी येथून निघेल. व ते बेंगलोर मध्ये 6:50 ला पोहोचेल. बेंगलोर टु कोल्हापूर हे विमान बेंगलोर हून दुपारी 2: 50 ला निघेल तर कोल्हापूरमध्ये सायंकाळी 4:45 ला पोहोचेल. कोईमतुर ते कोल्हापूर हे विमान कोईमत्तृहन दुपारी एक वाजता निघून कोल्हापूर मध्ये व्हाया बेंगलोर 4: 45 ला पोहोचेल., कोल्हापूर टू कोईमत्तूर व्हाया बेंगलोर हे विमान सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी कोल्हापूर येथून निघून ते कोईमत्तूर मध्ये 8 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल. असे वेळापत्रक इंडिगो एअरलाइन्सने जाहीर केले आहे .ही विमानसेवा कोल्हापूर विमानतळावर सलग सात दिवस सुरू राहणार आहे. इंडिगो एअरलाइन्सने अधिक माहितीसाठी गो इंडिया डॉट इन अथवा अधिक माहितीसाठी संबंधित इंडिगो अकाउंट मॅनेजर सी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.