वृत्तसंस्था/ बर्मिंगहम (ब्रिटन)
भारताचा अष्टपैलू कृणाल पंडय़ाबरोबर इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया आघाडीच्या वॉर्विकशायर क्रिकेट क्लबने आगामी रॉयल लंडन चषक वनडे स्पर्धेसाठी करारबद्ध केले आहे.
सदर स्पर्धा 2 ते 23 ऑगस्ट दरम्यान खेळविली जाणार आहे. अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचा मोठा भाऊ कृणालने अ दर्जाच्या 76 सामन्यांमध्ये खेळताना फलंदाजीत 2231 धावा तर गोलंदाजीत 89 बळी मिळविले आहेत. कृणालने आतापर्यंत पाच वनडे आणि 19 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2021 साली कृणाल पंडय़ाने इंग्लंडविरूद्ध वनडे क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले. पदार्पणातील पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरूद्ध त्याने 26 चेंडूत जलद अर्धशतक झळकविले होते.