बऱ्याच वेळेला घरामध्येच असणाऱ्या अनेक गोष्टी या सौंदर्यासाठी किंवा आरोग्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या असतात. पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. त्यांचे उपयोगही माहिती नसतात. आज आपण अशाच घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून कोणते फायदे मिळू शकतात, याच्या काही हेल्दी टिप्स जाणून घेणार आहोत.
कांद्याचा रस व मध मिसळून चाटण्याने कफ दूर होतो. तसेच आतड्यातील हानिकारक द्राव निघून जंतू मारतात.
लिंबाच्या रसात सुकलेल्या आवळ्याचे चूर्ण मिसळून केसांना लावल्याने केस काळे होतात. तसेच केसांच्या इतर तक्रारींवरही उपाय होतो. लिंबाच्या रसाने डोक्याची मालिश केल्याने केसांचे पिकणे व गळणे कमी होते.
एक ग्लास दुधात मध मिसळून रोज रात्री प्यायल्याने दुबळेपणा निघून जातो व शरीर सदृढ बनते.
हगवण किंवा जुलाब लागल्यावर कापूरची वडी पाण्यात मिसळून दिल्याने त्वरित आराम मिळतो. अशावेळी लहान मुलांना एक आणि मोठ्यांना २ वड्या पाण्यात टाकून द्याव्यात.
रोज झोपण्यापूर्वी डोळे गुलाब पाण्याने स्वच्छ केल्यास ते स्वच्छ आणि चमकदार होतात.
(टीप – वरील माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर अवलंबून असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)